(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील कसरगठा गावातील विहिरीत 60 वर्षीय मन्सराम नैताम यांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आले. मन्सराम नैताम हे मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती पोंभुर्णा पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीतून बाहेर काढले असून पोलिसांनी शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोंभुर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली येनगंदेवार करीत आहेत.