राजुरा पोलिस स्टेशन येथे वृक्षारोपण.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सध्या कोरोना महामारीमुळे प्राणवायूचे महत्त्व लक्षात आले आहे. प्राणवायूची गरज देखील भासत असून कृत्रिम प्राणवायूवर मानवाला अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक प्राणवायू निर्माण होण्यासाठी वृक्षलागवड गरजेचे आहे.या सर्व बाबी विचारात घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे च्या वतीने मा.गणवीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 18 जून 2021 रोजी वृक्षारोपण पंधरवाडा अंतर्गत राजुरा येथील पोलिस स्टेशन च्या आवारात API श्री झुरमुरे साहेब यांच्या हस्ते समतादुत बालाजी मोरे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल श्रीमंत कदम, अरविंद डुकरे व निलेश मेकाले उपस्थित होते.