(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- गावामध्ये कोरोना आजाराविषयी आणि लस विषयी मोठ्या प्रमाणात गैरसमज/अफवा असताना सुद्धा गावातील सर्व नागरिकांनी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी मिळून घेतलेल्या परिश्रमामुळे ४५ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे १००% लसीकरण पूर्ण करणे शक्य झाले.
आम्ही आमच्या गावामध्ये १००% लसीकरण करून दाखवलं, बाकी सरपंच्यानी सुद्धा पुढाकार घेऊन आपापल्या गावामध्ये १००% लसीकरणासाठी प्रयत्न करावा अशी विनंती ग्राम पंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे यांनी केली.