Top News

ग्राहक पंचायत भद्रावती कडून शेतकरी बांधवांना आव्हाहन. Customer



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यासाठी बी बियाणे व खते त्याचप्रमाणे कीटकनाशके काळजीपूर्वक घ्यावी. तसेच त्यांनी नामांकित कंपन्यांच्या बियाण्याची खरेदी करावी जेणेकरून बोगस बियान्यांचे संकट येणार नाही. त्याचप्रमाणे बियाणे,खते यांच्या पिशवी, पॉकेट फाटलेले नाही,सिल प्रमाणित केलेले आहे का याची खात्री करून मगच खरेदी करावी. त्याच प्रमाणे कीटकनाशकांचे डबे, कॅन हे चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी. पक्के बिल, वापरलेली बियाणे यांचे नमुने सांभाळून ठेवावे. रिकाम्या पिशव्या, पोती पीक हाती येई पर्यंत फेकू नयेत कारण त्या वर सर्व तपशील लीहलेला असतो बियाण्यामध्ये किंवा खतामध्ये काही दोष असल्यास त्याचप्रमाणे काही तक्रार असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्यासाठी या वस्तू आवश्यक असतात. कीटकनाशके त्यावर लीहलेल्या सूचनेनुसार काळजीपूर्वक वापरावी जेणेकरून कोणताही धोका निर्माण होणार नाही. गरज पडल्यास कृषी अधिकारी वा तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
योग्य तक्रार असल्यास मार्गदर्शनासाठी ग्राहक पंचायतशी संपर्क साधावा. (मो. ९८५०५४८४५४, ७०२०४६०४३९) असे आव्हाहन शेतकरी ग्राहक बांधवांना अ. भा. ग्राहक पंचायत भद्रावती द्वारा करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने