Top News

मॅजिक बस चंद्रपूर संस्थेचा पुढाकार 8000 अभ्यास कोपरे (Study Corner).


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मॅजिक बस चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात  संपूर्ण चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यात मूल, सावली, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभुर्णा, गोंडपीपरी,चामोर्शी ,गडचिरोली इत्यादी तालुक्यातील शाळांमध्ये "SCALE"  कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ४२,००० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम अविरतपणे राबविला जात आहे.
        सद्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. मात्र शिक्षणाला कुठेही विराम येऊ नये यासाठी "अभ्यास कोपरा"(Study Corner) नावाची नवी संकल्पना मॅजिक बस संस्था राबवित आहे. ही संकल्पना राबविण्यामागचा उद्देश असा की मुलांना नियमित अभ्यास करण्याची सवय लागावी,मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यासाचे वातावरण तयार व्हावे  व मुलांमध्ये अभ्यासाबाबत आवड निर्माण व्हावी, यापद्धतीने  मॅजिक बस संस्थेच्या उपक्रमाशी जुडणाऱ्या विद्यार्थ्यांना घराच्या एखाद्या कोपऱ्यात अशी जागा तयार करून विद्यार्थ्यांनी तिथे आपले शैक्षणिक  साहित्य ठेऊन नित्यनियमाने त्या एकाच जागी अभ्यास करावा, या साठी मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत आहे आणि त्याचे फलस्वरुप असे की मध्ये मुले अभ्यासाला लागली,मुलांच्या अभ्यासासाठी घरी सहाय्यक वातावरण निर्माण झाले,तसेच आई-वडील त्यांच्या शिक्षणासाठी ,अभ्यासासाठी आधार व महत्व सुद्धा देत आहेत. 
अभ्यासा साठी अभ्यास कोपऱ्याची (Study Corner) फार मोठी मदत झाली. जरी शाळा बंद  होत्या तरी देखील मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी  फोन द्वारे विद्यार्थी व पालकांच्या संपर्कात होते.  या उपक्रमाला पालक देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य करीत आहे त्यामुळेच आज संपूर्ण जिल्ह्यात ८००० विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यास कोपरे तयार करण्यात मॅजिक बस ला यश आलेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने