Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन.


(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे दिनांक 21 जून 2021 रोज सोमवारला आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर, शारीरिक शिक्षण विभाग निदेशक प्राध्यापक संतोष कुमार शर्मा सर, महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर सुशील कुमार पाठक सर, सह अधिकारी प्राध्यापक अमोल गर्गेलवार सर हे मान्यवर उपस्थित होते. आणि या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक त्याचप्रमाणे आभासी पद्धतीने विद्यार्थी जोडले गेले होते.

प्राध्यापक संतोष कुमार शर्मा सर यांनी मानवी जीवनामध्ये योगाचे महत्त्व समजावून सांगितले आणि आज चालू असलेल्या कोरोना महामारी च्या काळात प्रत्येक व्यक्तीने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि सुदृढ आरोग्य जगण्यासाठी योगा फार महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधीर हुंगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे आभासी पद्धतीनेही महाविद्यालयाचे विद्यार्थी जोडले गेले होते.
या कार्यक्रचे प्रास्तविक डॉ. सुशिलकुमार पाठक यांनी केले तर आभार प्रा. अमोल गर्गेलवार सर यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने