Top News

अभाविप तळोधी (बा.) शाखेच्या 'आम्ही ग्राम रक्षक' अभियानाला सुरुवात.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
तळोधी (बा.)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे संपूर्ण ब्रम्हपुरी जिल्हात ग्राम रक्षक अभियान दि. 18 जून ते 25 पर्यंत राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत ब्रम्हपुरी जिल्हातील ग्रामीण भागात व प्रामुख्याने अभाविपचे कार्यकर्ते आरोग्यसेवा सोबतच थर्मल स्क्रीनिग, ऑक्सिजन चेकअप, जंतुनाशक फवारणी व लसिकरणाबाबत जनजागृती, काळा साठी आवश्यक घटकद्रव चे पत्रक वाटप करून जनजागृती करणार आहेत. या अभियानाचा प्रमुखाने हेतू येत्या तिसऱ्या लाटेचा संभावित धोका जाणून घेता ग्रामीण भागात असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ,काळ्यासाठी कोणते आवश्यक घटक द्रवाची माहिती सांगणे. 100 % लसीकरण करणे व त्यातील लक्षणे आढळून आल्यास योग्य वेळी आरोग्य तपासणी करून घेणे व कोरोनाचा आपल्या गावापासून व आपल्या शहरापासून दूर ठेवणे हाच मुख्य उद्देश आहे. यात जिल्हाभरातील अभाविपचे कार्यकर्ते विविध गावात जाऊन हे अभियान करणार आहेत. यात ब्रम्हपुरी जिल्हातील 35 कार्यकर्ते हे आपापल्या स्थानी हे अभियान करणार आहेत.

या अभियानाची सुरुवात दिनांक 18 जून ला नागभीड तालुक्यातील उश्राळमेंढा या गावापासून सुरू करण्यात आली आहे. उश्राळमेंढा गावात 115 लोकांची तपासणी करण्यात आली. सर्वाना मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी अभाविप ब्रम्हपुरीचे जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर, किर्ती मुदगल, समता आकरे, अमोल गिरडकर, पलाश वाघ, धनंजय सोनवाने, वैभव नेवारे आदी अभाविप चे कार्यकर्ते आणि गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने