💻

💻

आंबेधानोरा परिसरातील वाघाचा बंदोबस्त करा:- जि. प. सदस्य राहुल संतोषवार

आ. सुधीर मुनगंटीवार व वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- मौजा आंबेधानोरा ता. पोंभूर्णा येथील परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातलेला असून सदर वाघ हा शेत-शिवार परिसरामध्येच फिरत असल्याने या परिसारातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सदर वाघाने या अगोदर एका स्थानिक शेतकऱ्याची गाय व बकरीची शिकार केलेली आहे. तसेच या परिसरात जास्तीत जास्त शेतकरी बांधव राहतात आणि सध्या शेतीची कामे सुरु झालेली असून त्यांना आपल्या शेतामध्ये शेतीची मशागत करण्याकरीता शेतामध्ये जाण्यास भिती निर्माण झालेली आहे.
त्यामुळे जर लवकरात लवकर सदर वाघाचा बंदोबस्त न केल्यास येथील शेतकरी आपल्या शेतीचे उत्पन्न घेवू शकणार नाही. यामुळे भविष्यात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करुन सदर वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करुन देण्याची मागणी जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार व वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत