Top News

वेकोलीच्या सर्व जीर्ण वसाहतीची तात्काळ दुरुस्ती करा.

भाजपा युवामोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा व्यवस्थापनास 15 दिवसाचा अल्टीमेटम.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
घुग्घुस:- घुग्घुस परिसरातील वेकोलीच्या सर्व जीर्ण वसाहतीची 15 दिवसात तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा घुग्घुस भाजपाच्या वतीने मा. देवरावदादा भोंगळे जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या सूचनेनुसार घुग्घुस वेकोली उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असा इशारा भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांनी घुग्घुस वेकोली व्यवस्थापनास निवेदनातून दिला आहे.
गुरुवारी सायंकाळी दरम्यान घुग्घुस येथील वेकोली वसाहतीच्या सुभाषनगर मधील क्वार्टर नंबर एमक्यू 73 व 74 दुमजलीचा जिनाचा स्लॅब खाली कोसळला. खाली राहणाऱ्याच्या टीनाच्या शेडवर स्लॅब कोसळल्याने टीनाचे शेड पडले यात चारचाकी वाहन ठेऊन असल्याने मोठे नुकसान झाले यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मागील एप्रिल महिन्यात रात्री दरम्यान याच भागात दुमजली जिनाचा स्लॅब कोसळला होता. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती दोन महिन्याचा कालावधी लोटत नाही तोच सुभाषनगर वेकोली वसाहतीतील दुमजली क्वार्टरच्या वरील जिनाचा स्लॅब कोसळला.
1990 च्या दशकात वेकोलीच्या कामगारांन साठी गांधीनगर, सुभाषनगर, रामनगर, इंदिरानगर इत्यादी वसाहतीचे निर्माण करण्यात आले होते. परंतु आता ह्या वसाहती जीर्ण अवस्थेत आहे. येथील वेकोलीच्या कामगारांना आपला जीव मुठीत घेऊन कुटुंबासह राहावे लागत आहे.
यापूर्वी मागील एप्रिल महिन्यात घुग्घुस वेकोली व्यवस्थापनास भाजपाच्या वतीने वेकोली कामगारांच्या समस्याकडे लक्ष वेधण्याकरिता निवेदन देऊन वेकोलीच्या सर्व जीर्ण वसाहतीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.

निवेदन देताना उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश सचिव संजय तिवारी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, वाहतूक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रत्नेश सिंग, माजी सदस्य सिनू इसारप, साजन गोहणे, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, भाजपा नेते बबलू सातपुते, श्रीकांत सावे, सुरेंद्र जोगी,विनोद गोडसेलवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने