Top News

प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवाला वॉटर फिल्टर आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धानोली येथे सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण.

माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या पुढाकारातून उपलब्ध.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील आदिवासीं दुर्गम भागात माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार याच्या संकल्पनेतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचे यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळावे या उद्देशाने वाटर फिल्टर भेट देण्यात आले,तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धानोली तांडा येथे सॅनिटायझर मशीन माजी आमदार संजय धोटे यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाली. दिनांक 4 जून 2021 ला माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी चनई सरपंच अरुण मडावी, धानोलीचे सरपंच विजय रणदिवे, मांडवाचे सरपंच सौ संगीता तलांडे, भाजपा शाखा अध्यक्ष कोरपना अनिल कवरासे वैद्यकीय अधिकारी डॉ.शालिनी तरोने, भाजयुमो जिल्हा सचिव ओम पवार, जगाजी सोयाम, ज्योतीराम मंगाम, गणपत मडावी, विपुल मुनावत, आरोग्य सेवक जे.डी.शिंदे आदी उपस्थित होते.


याप्रसंगी माजी अँड आमदार संजय धोटे यांनी ग्रामीण भागातील कोविड लसीकरण जनतेनेन घाबरता लस घेण्याची आव्हान केले,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे त्याठिकाणी सूचना केल्या, धानोली तांडा ग्रामपंचायत व प्राथमिक उपकेंद्र येथील कामकाजाबद्दल सरपंच विजय रणदिवे आरोग्य सेवक शिंदे यांचे कौतुक करून अभिनंदन केले. डॉ.शालिनी तरोने यांच्या कुशल आरोग्य सेवेबद्दल सुद्धा जनतेच्या वतीने आभार मानले गावातील नागरिक आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने