जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

वृक्षारोपण सोबतच त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे- उमेश जंगम, वनपरीक्षेत्र अधीकारी ,सामाजिक वणिकरण विभाग राजुरा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले वृक्षारोपण.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- जागतिक पर्यावरण दिना निमित्त सामाजिक वणिकरण विभाग राजुरा ,आदर्श शाळेतिल राष्ट्रीय हरित सेना विभाग व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा यांच्या संयुक्त वीद्यमाने कोविड नियमांचे पालन करीत वृक्षारोपणचा कार्यक्रम आदर्श शाळेकडील मोकळ्या पटांगणात घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सामाजिक वणिकरण विभाग राजुरा चे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम उपस्थित होते. तर प्रमुख अतिथि म्हणून नेफडो चे चंद्रपुर जिल्हा संघटक विजय जांभूळकर ,वनपाल विलास कुंदोजवार ,आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलीनी पिंगे आदिंची उपस्थिती होती.


यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करतांना जंगम यांनी पर्यावरणाचे मानवाच्या जीवनातील स्थान आणि त्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणा सोबतच वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून झाडे लावण्या सोबतच आपण झाडे जगवीन्याचाही संकल्प केला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात जीवसृष्टीतिल प्रत्येक घटकांचा महत्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरुवातीला वृक्षपूजन व नंतर उपस्थित मान्यवरांना ग्रामगीता पुस्तक भेट देण्यात आले. नेफडो च्या तालुका अध्यक्षा अल्का सदावर्ते यांनी पर्यावरण गीत गायन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष संतोष देरकर ,उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते ,राजश्री उपगण्लावार ,सूनैना तांबेकर ,वर्षा कोयचाळे , पूर्वा खेरकर ,उमेश लढी, सुजीत पोलेवार ,आशीष करमरकर ,मोहन मेश्राम ,मनोज तेलिवार ,प्रदीप भावे ,आकाश वाटेकर ,रवी बुटले ,संदीप आदे ,नितीन जयपूरकर आदींसह राष्ट्रीय हरित सेनेच्या प्रमुख विध्यार्थीनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय हरित सेना प्रमुख तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले यांनी केले. यावेळी उपस्थितांनी वृक्षलागवडी सोबतच वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत