Click Here...👇👇👇

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन राष्ट्र धर्म युवा मंच लोणी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर, कोरपना
कोरपणा:- संपुर्ण जिवसृष्टिला प्राणवायु देण्याचे पवित्र कार्य वृक्ष करित असते. त्यासाठी वृक्षारोपण तथा वृक्ष वृसंवर्धन करणे काळाची गरज आहे.
आधुनिक युगात मानवाला नैसर्गिक संसाधनाचा विसर पडत चालला आहे,याची प्रचिती आपणास महामारी संकटाच्या वेळी येत आहे. जो प्राणवायु आपणास वृक्षांपासुन मोफत मिळतो तो आज पैसे मोजुन सुध्दा मिळेणासा झाला आहे,हे शक्य झालं फक्त मानवाच्या गलथानामुळे. ही चुक मानवाने मान्य करूण पुर्ववत प्रकृतिशी कसलिही छेडछाड़ न करता त्याचे जतन केल्यास कोविड महामारी सारखे साथिचे रोग मानवांवर आक्रमन करणार नाही हे निश्चत.
वरिल बाबिंचे अध्ययन करूण राष्ट्र धर्म युवा मंच लोणी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावातिल हनुमान मंदिर तथा संत फुलाजी महाराज मंदिराचे प्रांगणात वृक्षरोपण करूण प्रकृतेप्रती असलेले सर्व सर्व दायित्व पार पाडण्यात आले.
यावेळी प्रतिष्टित नागरिक वासुदेव आवारी,राष्ट्र धर्म युवा मंच चे तालुका प्रवक्ता तुकाराम महाराज कोकणारे,सतिश मुसळे,ओम थेरे,गोवर्धन बोधे,सारंग मुसळे, अविनाश सिडाम,मयुर बोबडे यांचे सह गावातिल बाल गोपाल उपस्थिति होते.