जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

१ हजाराची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- शेतजमिनीचा फेरफार करण्यासाठी एका इसमाकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली तालुक्यातील येवली येथील मंडल अधिकारी गिरीधर धानूजी सोनकुसरे(५७) यास रंगेहाथ पकडून अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या इसमास सर्वे क्रमांक १२७/ब या शेतजमिनीचा फेरफार करावयाचा होता. परंतु यासाठी मंडळ अधिकारी गिरीधर सोनकुसरे याने २ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती तो १ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला.
परंतु लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने संबंधित इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथील विश्रामगृहात सापळा रचून मंडळ अधिकारी गिरीधर सोनकुसरे यास १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड पोलिस निरीक्षक यशवंत राऊत यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत