Top News

विधानसभेतील 12 निलंबित आमदारांचे निलंबन त्वरीत रद्द करा. #bjp #chandrapur


भाजपा ओबीसी मोर्चाची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- विधानसभेतील निलंबित आमदारांचे निलंबन त्वरीत रद्द करण्याबाबत भाजपा ओबीसी मोर्चा,चंद्रपूर महानगरातर्फे तहसिलदार सामान्य प्रशासन चंद्रपूर यांच्या मार्फत मा.राज्यपाल यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले. #bjp #chandrapur
सदर निवेदनातून अशी मागणी केली की,महाराष्ट्र सरकारनी दि.५ जुलै ते ६ जुलै दरम्यान दोन दिवसाचे पावसाळी अधिवेशनाचे आयोजन केले होते.तर दि.५ जुलै रोजी विधानसभेत झालेल्या सञात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संदर्भातील मुद्दा उपस्थित झाल्यावर विरोधीपक्षाच्यावतीने प्रामाणिकपणे न्यायाची बाजू मांडणा-या १२ आमदारांना तालिका अध्यक्षांनी त्यांच्या बोलण्यास मज्जाव करीत थांबवण्याचा प्रयत्न केला,या गैरवर्तनाच्या विरुद्ध सर्व आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील बेल मध्ये घोषणाबाजी केल्यामुळे भाजपच्या या १२ आमदारांना वर्षभरासाठी सभागृहाच्या सञातून निलंबन केले आहे. तर ही कार्यवाही अतिशय लांचनास्पद असून यामुळे महाविकास सरकारचे ओबीसी समाजा विरोधी असलेले धोरण आता उघडे पडले आहे.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात असतांना सुद्धा सरकार अजूनही सदर विषयावर गंभीर नाही.राज्याच्या सर्वोच्च सभागृहात या विषयावर चर्चेस तयार नाही.त्यामुळे या विषयावरील भाजपच्या आमदारांची आक्रमकता व लढवय्येपणा अभिनंदणीय असून या सर्व आमदारांचे भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने हार्दिक आभार मानतो.आणि अन्यायाविरुद्ध लढणा-या भाजपा आमदारांचे निलंबन करुन लोकशाहीची हत्या करणा-या मोगलाई सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.
राज्यातील ओबीसी आरक्षणाची बाजू मांडून सरकारला जाब विचारणा-या व कोणतीही शिवीगाळ न केलेल्या आमदारांचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चांगले दिसत असतांनाही केवळ सुड भावनापोटी व ओबीसींचा आक्रोश दडपून ठेवण्यासाठी हे निलंबन आहे.सदर निवेदनाद्वारे आम्ही मागणी करतो की,हे निलंबन त्वरीत मागे घ्यावे व ओबीसी आयोगाचे गठन करुन इम्पेरिकल डाटा गोळा करुन मा.सर्वोच्च न्यायालयात सादर करुन रद्द झालेले आरक्षण पूर्ववत आणून द्यावे.आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कोणत्याही निवडणूका जाहीर करुन नये अशी मागणी भाजपाओबीसी मोर्चा चंद्रपूर द्वारे करण्यात आली. यावेळी अध्यक्ष विनोद शेरकी, महामंत्री शशिकांत मस्के, महिला अध्यक्षा सौ वंदनाताई संतोषवार, मधुकरजी राऊत, महेश कोलावार, सौ अरुणा चौधरी, संजय दाभाडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने