सापाने दंश केल्याने 4 जण ग्रामीण रुग्णालयात भरती. #Snake #snakenews

Bhairav Diwase

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सद्या शेतीची हंगाम आहे त्यामुळे सर्वजण लगबगीने शेतात कामे करण्यासाठी जात असतात. त्यामुळे शेतात असलेल्या अनेक सापांचा चावा घेण्याचा प्रकार सुरू केला असून सावली परिसरातील 4 जण ग्रामीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहे.
सावली तालुक्यातील चांदली येथील दिनेश मारोती मुठावार वय 30 वर्ष हे ट्रक्टर वर बसले असता सीट च्या मागील बाजूस लपून बसलेल्या सापाने हातावर चावा घेतला. साप चावल्याचे लक्षात येताच काल रात्रौ ला ग्रामीण रुग्णलयात भरती करण्यात आले.
रुद्रापूर येथील मंगला अरुण झरकर वय 45 वर्ष ही महिला रोवणी साठी शेतात गेल्यावर सापाने हातावर चावा घेतला. काही तरी हाताला चावल्याचे लक्षात येताच हात सुजायला लागला त्यानंतर विलंब न करता सावली ग्रामीण रुग्णालयात भरती झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी सावली येथील शोभा तुळशीराम प्रधाने वय 60 वर्ष शेतात रोवणी साठी गेले असता सापाने पायाला चावा घेतला.
सिंदोळा येथील कु. प्रांजली मुकरू कंकलवार हिला घराच्या बाजूला असलेल्या शेतात रात्रोला सापाने पायाला चावा घेतल्याने तिला सुद्धा सावली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेले आहे.
या सर्व रुग्णांवर योग्य उपचार झालेला असून प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र या वर्षी सावली तालुक्यात सापाने चावा घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरामध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे.