Top News

राजकीय अडथळा दूर करण्यासाठी सुपारी देऊन केली हत्या! #Arrest #Murder #Corporator


नगरसेवक प्रशांत खोब्रागडेला अटक; 5 लाखांची दिली होती सुपारी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- आगामी निवडणुकीतील संभाव्य अडथळा दूर करण्यासाठी सुपारी देऊन दुर्योधन रायपूरे यांची हत्या केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणून नगरपरिषदेचे वित्त व नियोजन सभापती, नगरसेवक प्रशांत खोब्रागडे याला अटक केली आहे. त्यानेच पाच लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय आणखी ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. #Arrest #Murder #Corporator
प्रशांत खोब्रागडे हा गडचिरोलीतील फुले वॉर्डचा नगरसेवक आहे. दुर्योधन रायपुरे यांची २४ जून रोजी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी अमन कालसर्पे (वय १८), प्रसन्ना रेड्डी (वय २४), अविनाश मत्ते (वय २६), धनंजय उके (वय ३१) सर्व रा. गोंदिया यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात हे हत्याकांड राजकीय वैमनस्यातून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.
येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय अडथळा बाजूला सारण्याच्या दृष्टीने संभाव्य उमेदवार म्हणून दुर्योधन रायपूरे यांना संपविण्याचा कट रचण्यात आला. खोब्रागडे यांने गोंदिया जिल्ह्यातील चौघांना ५ लाख रुपयांची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी खोब्रागडे हा तिथे हजर नव्हता. मात्र काम फत्ते झाल्यानंतर सुपारी घेणाऱ्यांना त्याने ५० हजार रुपये दिले. नगरसेवक प्रशांत खोब्रागडे याला अटक करण्यात आली असून आज शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने