8 वर्षीय नाबालिक मुलीवर अत्याचार. #Torture #Arrested


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दोन महिन्यांपूर्वी नाबालिक मुलीवर अत्याचार केल्याची घटना भद्रावती शहरात नुकतीच उजेडात आली असून या प्रकरणातील आरोपीस पोलिसांनी गजाआड केले आहे. #Torture #Arrested
   पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वणी येथील एक ८ वर्षीय नाबालिक मुलगी आपल्या आईसोबत आपल्या आजीकडे आली होती. दि.१५ मे रोजी आजीचे ऑपरेशन असल्याने तिची आई आजीसोबत चंद्रपूरला गेली होती. त्यामुळे सदर मुलगी आजीच्या घराजवळ असलेल्या मोकळ्या जागेतील झुल्याकडे खेळायला गेली.
   
दरम्यान, अशोक नथ्थू वनकर (५९) रा. डोलारा तलाव भद्रावती हा तेथे आला व त्याने पिडीतेला आपल्या मांडीवर बसविले. तेवढ्यात त्याची पत्नी तेथे आली. त्यामुळे तो आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर थोड्या वेळाने परत तो तेथे आला व त्याने पिडीतेला नवीन घर दाखवितो म्हणून सोबत घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला व याबाबत कुठे वाच्यता केल्यास तुझ्या कुटुंबातील सर्वांना जाळून जीवे मारुन टाकीन अशी धमकी तिला दिली.
परंतू दि.११ जुलै रोजी पोलिसांना नाबालिक मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार प्राप्त होताच त्यांनी आरोपीस तात्काळ त्याच्या घरुन अटक केली. त्याच्या विरुद्ध भा.दं.वि.३७६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुनिलसिंग पवार यांचा मार्गदर्शनात वरोरा पोलिस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया जाधव करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत