Click Here...👇👇👇

युवा मोर्चाच्या माध्यमातुन जिल्हाभरात संगटनविस्तारासाठी प्रयत्न व्हावे!::- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे. #bjp #bjym

Bhairav Diwase

भाजयुमोतर्फे आज जिल्ह्यात सर्वत्र वृक्षारोपण.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या १२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतिने सर्व २२ मंडळात एकूण १००० वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले आहे. #bjym
यासाठी स्थानिक मंडळांवरिल युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येत उपस्थित रहाण्याचे आवाहन भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी दि. ११ जुलै दुपारी १.३० वाजता पार पडलेल्या संवाद सेतू कार्यक्रमातून केले आहे. या संवाद सेतू मध्ये जिल्ह्यातील सर्व युवा मोर्चा चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
त्याच बरोबर बल्लारपुर शहरात सायंकाळी ६.०० वाजता पार पडलेल्या आढावा बैठकीत सुद्धा होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात चर्चा करून कार्यक्रम पूर्ण शक्तीने संपन्न करण्याचे आव्हान भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले. या प्रसंगी कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजय दुबे त्याच बरोबर भाजपा बल्लारपूर शहराध्यक्ष काशिनाथ सिंह, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथलेश पांडे, गुलशन शर्मा प्रतीक बा, मनीष रामील्ला,श्रीकांत उपाध्याय, संजय बाजपेयी,आदित्य शिंगाडे, मौला निषाद, शुभम बहुरिया, श्रावण मोगरम, तुषार मालेकर, विजय केसकर, संतोष वर्मा, वेंकट येलमल्ला, राजेश गुराला त्याचबरोबर
भाजयुमोचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. #bjp