Top News

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याभरात ठिकठिकाणी कोविड योद्ध्यांचा सत्कार. #Chandrapur


भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- राज्याचे माजी अर्थ, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, लोकलेखा समिती प्रमुख, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ५९ वा वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र आजचा दिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. #Chandrapur

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर तसेच जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र २२ मंडळामध्ये कोरोणा महामारीमध्ये जिवाची पर्वा न करता योद्ध्यांप्रमाणे लढा देवून कुठे प्रत्यक्ष तर कुठे अप्रत्यक्षपणे जनसेवा करून आपले योगदान देणाऱ्या कोविड योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये जिल्ह्याभरातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, सफाई कामगार, रुग्णवाहिका व शववाहिकांचे चालक, शासकीय कर्मचारी, पत्रकारबंधू, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, कुरीअर बॉय, औषधविक्रेते, आटाचक्कीवाले, भाजीपाला विक्रेते, किराणा विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, दुधविक्रेते, सिलेंडर बाॅय, ऑटोचालक इत्यादी. अशा सर्व कोविड योद्ध्यांचा समावेश आहे.
ठिकठिकाणी पार पडलेल्या या सत्कार कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात भाजयुमोचे सर्व महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव, मंडळ अध्यक्ष,आदि सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने