आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ५९ युवकांनी भाजयुमो मध्ये पक्षप्रवेश करून घेतला जनसेवेचा संकल्प. #Ballarpur #BJP #BJYM

Bhairav Diwase
पक्षाच्या माध्यमातून युवकांच्या व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्या:- आशिष देवतळे.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ५९ व्या वाढदिवसाच्या दिनाचे औचित्य साधून व त्यांच्या विकास कार्याला प्रभावित होऊन कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजय दुबे यांच्या मार्गदर्शनात, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व युवा नेता मनीष रामील्ला यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरातील ५९ युवकांनी भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये पक्ष प्रवेश केला. #Ballarpur #BJP #BJYM
या कार्यक्रमात युवकांना संबोधित करताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे म्हणाले भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष नसून परिवार आहे आणि गोर-गरीब,शोषित व पीडित जनतेला न्याय मिळवून देणे तसेच जनतेच्या व युवकांच्या न्याय हक्कासाठी लढने हेच या पक्षाचे उद्देश आहे याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी जनतेचा आवाज बुलंद करा असे आव्हान केले.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, नगरसेवक येलय्या दासरफ, जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, गुलशन शर्मा, मल्लेश कोडारी, प्रतीक बारसागडे, श्रीकांत उपाध्याय, आदित्य शिंगाडे, मौला निषाद, रिंकू गुप्ता, त्याच बरोबर असंख्य युवकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी बल्लारपूर कार्यालयामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे संचालन आदित्य शिंगाडे यांनी केले.