उपमहापौरांनी आयोजित केले योग प्रशिक्षण व आरोग्य तपासणी शिबिर.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महानगरपालिकेचे युवा उपमहापौर राहुल पावडे यांनी जगन्नाथ बाबा मंदिरात कोरोना लसीकरण व अगरसेन भवन येथे योग प्रशिक्षण व आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन केले.या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी दोन्ही शिबिराचा लाभ घेतला.सकाळी 6 च्या सुमारास योग  शिक्षक  विजय चंदावार,श्री व्यास व आचार्य यांनी योग प्रशिक्षण दिले.11 वाजता च्या सुमारास डॉ सोनवणे,डॉ आखाडे व डॉ घोरपडे यांनी आरोग्य तपासणी केली.हिमोग्लोबिन,ब्लड प्रेशर,शुगर, ब्लड युरिया ,रक्त गट आदी चाचण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महिला मोर्चा (श)जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,महामंत्री शिला चव्हाण, उपमहापौर राहुल पावडे,नगर सेविका सविता कांबळे यांच्या हस्ते केक कापून आ.सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यशस्वितेसाठी  सुरेश हरीरामानी,रवी जोगी,संदीप देशपांडे,रवी लोणकर,संजय निखारे,प्रमोद क्षीरसागर,चंदभाई,रितेश वर्मा,शुभम खिरडकर,सत्यम गाणार,मयूर जोशी,अमित गौरकर आदित्य डवरे व महेश राऊत यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या