Top News

जिल्ह्यात जोरदार पावसाने मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे उघडले २४ दरवाजे. #Dam #24doors


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 24 दरवाजातून 43680 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणात एकूण 83 गेट असून त्यातून फक्त 24 गेट सध्या उघडण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे. याच पावसामुळे मेडीगट्टा लक्ष्मी धरणातील पाणीसाठा वाढला. परिणामी या धरणाचे 24 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. #Dam #24doors
नद्यांमधील पाणी धोक्याच्या इशारा पातळीच्या खाली.

मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पाऊस वाढल्यामुळे गडचिरोलीतील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाची पाणीपातळी वाढली आहे. याच कारणामुळे या धरणाचे सध्या 24 दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणाला एकूण 83 गेट आहेत. यातील 24 गेट हे उघडण्यात आले आहेत. वैनगंगा नदी, वर्धा नदी, प्रणहिता नदी, इंद्रावती नदी, तसेच पारलाकोटा या नद्या गडचिरोली जिल्ह्याला लागून आहेत. गडचिरोली तसेच इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. मात्र या सर्व नद्यांची पाणीपातळी केंद्रातील नोंदीनुसार धोक्याच्या इशारा पातळीच्या खाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने