(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कुरखेडा:- कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव येथे शेतशिवारात रोवणीचा कामाकरीता शेतात चिखल करताना ट्रॅक्टर पलटून अपघात झाला यात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटणा आज रविवार १८ जूलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
अक्षय दयाराम जूमनाके (२४) असे मृतक ट्रक्टर चालकाचे नाव आहे. मृतक अक्षय हा स्वमालकीच्या ट्रॅक्टरने गावातीलच रामकृष्ण जूमनाके यांच्या शेतात रोवणी करीता चिखल करीत असताना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका बांधीत चिखल झाल्यावर दुसऱ्या बांधीत ट्रॅक्टर नेत असतांना पारीवर ट्रॅक्टर अनियंत्रित होत पलटल्याने ट्रॅक्टर खाली दबत त्याचा घटणास्थळीच मृत्यु झाला.
घटनेची माहीती मिळतच पोलीस हवालदार गौरीशंकर भैसारे, पोलीस शिपाई नितीन नैताम घटणास्थळी पोहचत घटनेचा पंचनामा केला व शव ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय कूरखेडा येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास कुरखेडा पोलीस करत आहे.
#Death
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत