जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आफ्रोह संघटना-महाराष्ट्र शाखा- चंद्रपूर तर्फे साखळी उपोषण. #Fasting(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- ऑर्गनायझेशन फार राइट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र या संघटने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच जुलै पासून साखळी उपोषणाला प्रारंभ केला होता. शासनाने शासकीय सेवेतील नियमित कर्मचार्‍यांना जात प्रमाणपत्र अवैध झाल्याकारणाने अकरा महिन्याच्या तात्पुरत्या स्वरूपात अधिसंख्य पदावर नेमणूक करून त्यांची वेतनवाढ, पेन्शन व अनुकंपा सारखे लाभ रोखून धरले, हा त्यांच्यावर अन्याय असून त्याचा निषेध करण्यासाठी राज्य शाखेचे अध्यक्ष सन्माननीय सहारकर सर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालया समोर बसून साखळी उपोषण केले व शासनाचा निषेध केला. 
कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर शासनाने 21 डिसेंबर 2019 ला अधिसंख्य पदाचा जी.आर. काढून अनुसूचित जमाती संवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या व सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आल्या, त्यांना कंत्राटी केले ,त्यांचे पेन्शन व भत्ते बंद केले, सेवा समाप्त व सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांना कुठलाही आर्थिक लाभ दिला नाही, त्यांचे कुटुंब उपासमारीने रस्त्यावर आले, या अधिसंख्य पदाचा जी.आर. ने संपूर्ण महाराष्ट्रातील 25000 कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे जीवन धोक्यात आणले. त्याचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शाखेने सुद्धा या उपोषणात सहभाग घेतला व 5/7/2021 ते 9/7/2021 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे साखळी उपोषणात सहकुटुंब बसले ,या उपोषणात कोरोणा चे सर्व नियम पाळून उपोषण आरंभ केले. या उपोषणासाठी आमच्या चंद्रपूर शाखेतर्फे श्री राजीवजी धकाते -सेवानिवृत्त शाखा अभियंता व सेवानिवृत्त पोलीस वरिष्ठ लिपिक खाडिलकर साहेब यांचे मार्गदर्शनात संघटनेचे अध्यक्ष संजय राव बोधे शिक्षक तसेच सचिव कैलास उरकुडे, विजय भाऊ सोनवणे , वनरक्षक रमेश कुंभार सर हिराजी कुंभारे साहेब प्रमोद सोरते सर ,ताराचंद सोनकूसरे सर, विजयश्री सोनकुसरे मॅडम, भास्कर धकाते सर ,दुर्वास पराते साहेब, विनोद पेकडे साहेब, प्रवीण डफाडे सर आदींनी उपोषणात सहभाग घेऊन संघटनेचे आंदोलन यशस्वी करून दाखविले, त्याबद्दल सर्वांचे संघटनेच्यावतीने खूप खूप अभिनंदन व व आभार. या पाच दिवसांच्या साखळी उपोषणात चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते व महानगरपालिका चंद्रपूरचे नगरसेवक श्री पप्पू जी देशमुख साहेब यांनी उपोषण मंडपाला भेट दिली व आमच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच ठाकूर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य संघटना, महादेव कोळी संघटना, महाराष्ट्र राज्य, आमच्या उपोषणास सक्रिय पाठिंबा दर्शवून सहकार्य केले. उपोषणात दुसऱ्या दिवशी 6 जुलैला राज्य शाखेचे अध्यक्ष मा. शिवानंद साहरकर सर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मार्गदर्शन केले.
त्यांच्या साथीला राज्य शाखेचे कायदेशीर सल्लागार मा. मनोज जुनोकर  यांनी मंडपाला भेट देऊन मार्गदर्शन केले. साखळी उपोषणाची संपूर्ण तयारी करण्यासाठी व जुळवाजुळव, भेटी-गाठी घेणेसाठी संघटनेच्या प्रत्येक सभासदाने मोलाचे सहकार्य करून उपोषण यशस्वी करून दाखवले व शासनाच्या निदर्शनास आणून दिले की आम्ही हा अन्याय आता यापुढे सहन करणार नाही . आमचा प्रश्‍न येत्या हिवाळी अधिवेशनात जर सोडविला गेला नाही, तर आमरण उपोषणाची तयारी आम्ही करू असा खणखणीत इशारा या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला दिला व याकडे सर्वांचे लक्ष वेधले. आज उपोषणाच्या शेवटच्या दिवशी आमच्या संघटनेचे सभासद विजय भाऊ सोनवणे, तसेच डफाडे सर यांनी उपोषणाला बसून शासनाचा निषेध नोंदविला व त्यांना सहकार्य करण्यासाठी, अतिशय महत्त्वाचे काम सोडून यवतमाळवरुन राजीवजी धकाते साहेब हे सुद्धा वेळेवर उपस्थित होऊन उपोषण मंडपात पाणी पाऊस, वारा, याची तमा न बाळगता मंडपात  सामील झाले व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना उपोषण बंद करत असून याबाबतचे व आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने दिले, तसेच सतत पाचही दिवस आमचे  पोलिस विभागातील सेवानिवृत्त अन्यायग्रस्त कर्मचारी खाडिलकर साहेब यांचे सुद्धा खूप मोलाचे सहकार्य या ठिकाणी लाभले. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार आणि कौतुक. संघटनेचे अध्यक्ष संजय बोधे, सचिव कैलास उरकुडे यांनी सर्वांचे आभार मानले व उपोषणाची सांगता केली.
#Fasting

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या