Top News

बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार..... #HSCresult


पुणे:- बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 29 ते 31 जुलै या कालावधीत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावीनंतर आता बारावीचा निकालही चांगला लागण्याची अपेक्षा केली जात आहे. #HSCresult
🥛जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग"
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये होणारी बारावीची परीक्षा रद्द केली आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल लावणार असल्याचे जाहीर केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बारावीचा निकाल राज्य सरकारला 31 जुलैपर्यंत जाहीर करावा लागणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाने बारावीच्या निकालासाठीचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी महाविद्यालयांना शुक्रवारपर्यंतची (ता.२३) मुदत दिली होती, त्यानंतर, एक दिवसाची मुदतवाढही देण्यात आली होती.
दरम्यान, हे निकाल तयार करण्यासाठी राज्य मंडळाने शिक्षकांना संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीत कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत राज्य मंडळाने दिलेल्या कार्यपद्धतीनुसार अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरले जात आहेत. बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाची माहिती अपलोड करताना सातत्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे बहुतांश ज्युनियर कॉलेजकडून विद्यार्थ्यांचे गुण मंडळाकडे सादर केले आहेत. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांबाबतच्या अडचणी सोडल्यास त्यानुसार बहुतांश नियमित विद्यार्थ्यांचे गुण अपलोड झालेले आहेत. दहावीप्रमाणेच बारावीच्याही निकालाच्या टक्केवारीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने