Click Here...👇👇👇

NMMS परीक्षेत जि. प. उच्च प्राथ. शाळा चेक आष्टा शाळेचे भरघोष यश. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकरडून स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपचं नाव नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप National Means-cum-Merit Scholarship (NMMS) आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मदत केली जाते. नुकताच केंद्र शासनामार्फत इयत्ता 8 वीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात येत असलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. या राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेऊन यश मिळविले आहे. #Pombhurna
या परिक्षेला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेतील इयत्ता 8 वीच्या एकूण 20 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी 7 विद्यार्थी या परिक्षेत पास झाले. कोरोना परिस्थित हे मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. आयुष्य दिलीप येरमे, नोकेश अर्जुन मरस्कोल्हे, युवराज रमेश रासपल्लीवार, रंजन संदिप मडावी, सुमित रामदास तोडासे, भाग्यश्री दामोधर येरमे, आकांक्षा बंडू टेकाम विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. तसेच या परीक्षेसाठी मार्गदर्शन श्री सतिश शिंगाडे सर यांनी केले.
      या परिक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक आष्टा शाळेचे मुख्याध्यापक श्री अरूण यामावार, सतिश शिंगाडे सर, श्री विनोद पोगुलवार सर, कु. सविता लाकडे मॅडम, ग्रा.‌ प. सरपंच कांता मडावी यांनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.