Click Here...👇👇👇

शिवसेनेतर्फे मदतीचा हात... #Shivsena

Bhairav Diwase


शिवसेना जिल्हाप्रमूख संदिपभाऊ गिर्हे यांच्या उपस्थीत आर्थिक मदत.

पोंभुर्णा:- तालुक्यातील उमरी पोजदार येथील श्री. मनोज यादव उपरे वय वर्ष ३४ रा. उमरी पोतदार ता. पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर अचानक २३/०७/२०२१ ला काळाने घात केला आणि त्यांचे आयुष्य संपले. मोलमजुरी करून जगणारा हा माणूस कायम अनेकांच्या मदतीला धावून यायचा. घराचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाची मोठी हानी झाली. यांच्या मागे दोन लहान मुली आणि एक पत्नी आहे. अचानक काळाने घात करून त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट उभे केले अशातच यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणुन शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री नाम. उध्दव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या आव्हानाला साद देत शिवसेनेतर्फे आर्थिक मदत म्हणून ५००१ रुपये त्या कुटूंबाला देण्यात आली. #shivsena

त्या कुटुंबातील लहान दोन्ही मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी शिवसेना घेईल असे त्या कुटूंबाला शिवसेना  जिल्हा प्रमूख संदीपभाऊ गिर्हे यांनी सांगीतले व केव्हा ही काही अडचन भासेल तर तुम्ही हाक मी साथ देईल असे त्या कुटूंबाला धीर दिले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमूख संदीपभाऊ गिर्हे, आशिष कावटवार, पोंभुर्णा शहर प्रमुख गणेश वासलवार, किशोर डाखरे, संदिप ठाकरे, पवन गेडाम, बुरांडे, अनुश उराडे, उपसरपंच मगेश उपरे, सोनू ठाकुर, सुचित पिपळशेंडे, सुरज घोंगे, अभिषेक बद्दलवार, सचिन आत्राम, महेश श्रिगिरिवार व आदी उपस्थीत होते.