Top News

स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे अशोक लेलॅन्ड भंडारा येथील अधिकारी चमूची भेट. #Mangi #Rajura

अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे अधिकारी यांचा अभ्यास दौऱ्यात सहभाग.

कोंडवाडयाचे वाचनालयात रुपांतर करणारे पहिले गाव.

100 टक्के लसीकरण करणारी ग्रामपचंचायत म्हणून नावलौकीक.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, गावकऱ्याची नियमित सकाळी 4:30 वाजता श्रमदानातून स्वच्छता, सौंदर्यानी व फुलांनी नटलेला बंगीचा, गावाच्या मध्यभागी कोंडवाडयातून रुपांतर केलेले सार्वजनिक वाचनालय. सुंदर शालेय परिसर, शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा तसेच सर्व धर्मीय संस्कृतीचे संरक्षण, कोवीड-19 लसीकरण 100 टक्के करणारी ग्रामपंचायत इत्यादी. स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी करण्यासाठी भंडारा येथील अशोक लेलॅन्ड कंपनीचे युनिट हेड जोशी साहेब व त्यांचे सोबत असलेले मेंढे साहेब आणि पुरंदरे साहेब तसेच या चमूसोबत अंबुजा सिमेंट फाउन्डेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांतजी कुंभारे तथा जितेंद्रजी बैस, संतोषजी विश्रोजवार तथा ज्योतीताई खंडाळे यांनी भर पावसात भेट देवून पाहाणी केली. 


सर्व भेट देणारे चमू सदस्यांचे सर्व प्रथम पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
माजी उपसरपंच वासुदेवजी चापले यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगताना सन 2012 पासून ग्रामस्थ व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे 4:30 वाजता पासून 2 तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहे. ही बाब अभ्यास दौऱ्यातून पाहणी करतांना स्वच्छता पाहून तर भाराहून गेले. यानंतर संपूर्ण गावाची पाहणी करण्यात आली. पाहणी करताना दृष्यस्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता, गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, 2250 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, स्वच्छ शालेय परिसर, शाळा बंद पण शिक्षण सुरु उपक्रमाची अंमलबजावणी, 100 टक्के करवसुलीचे प्रयत्न, युवक - युवतीसाठी विविध स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग, कोवीड-19 लसीकरण 100 टक्के करणारी ग्रामपंचायत तथा ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी ISO होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नाविण्यपूर्ण उपक्रम दाखविण्यात आले.
स्मार्ट ग्राम पंचायत मंगी (बु) येथील श्रमादानाची व विकास कामाची पाहाणी करण्यासाठी संपूर्ण गावाचे दर्शन अभ्यास दौरा चमू सोबत माजी उपसरपंच वासुदेवजी चापले व माजी सदस्य शंकर तोडासे, शिल्पाताई कोडापे तथा ग्रामसेवक गजानन वंजारे, मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, माजी अध्यक्ष्‍ गणपतजी चापले यांचे उपस्थितीत करण्यात आले. मंगी (बु) हे शाश्वत विकासाचे नाविण्यपूर्ण मॉडेल असल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.


याप्रसंगी मंगी (बु) चे गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, डाटाएन्टी ऑपरेटर बालाजी मुंडे, रोजगारसेवक दिनेश राठोड, वसंत सिडाम तथा अनुसयाबाई कुळसंगे व फुलाबाई सिडाम यांना मोलाचे सहकार्य केले.
#Mangi #Rajura

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने