चिनोरा येथे विठ्ठल रूख्माईची मूर्ती व मंदिरावर भव्य कळसाची स्थापना. #Establishment

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- वरोरा शहरापासून जवळच २ कि.मी.अंतरावर असलेल्या चिनोरा या गावात दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिरात लोकवर्गणीतून विठ्ठल रूख्माईच्या मूर्तीची स्थापना नुकतीच करण्यात आली.


      तसेच या मंदीरावरील कोरीव कामात संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री गणपती, संत आडकुजी महाराजांचे नक्षीकाम केलेले भव्य कलशाची स्थापना मंदीर प्रशासनाचे अध्यक्ष नथ्थुजी खेडकर व अविनाश ढेंगळे यांच्या नेतृत्वात नुकतेच करण्यात आले.  
     याप्रित्यर्थ दि. २४ जुलै रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक डाॅ. अंकुश आगलावे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यात वंदनिय तुकडोजी महाराजांचे आदर्श गाव वं. तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतुन शक्य होवू शकते असे विचार मांडले. वं. तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेतील ओव्या ’गावागावाची जागवा, समुळ भेदभाव मिटवा, उजडा ग्राम उन्नतीचा दिवा, ग्राम होईल आदर्श या ओव्यांचे दाखले देत गावाची संकल्पना यावेळी मांडली.  


        यावेळी  चिनोरा ग्रा.पं.च्या सरपंच ताई परचाके, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष, सामाजिक व राजकीय पक्षातील कार्यकर्ते,  गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक, प्रशासकीय अधिकारी, चिनोरा गावांतील ज्येष्ठ, वयोवृध्द, बालगोपाल मंडळी  उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता गजानन भोयर, त्रिशुल विभुते, लक्ष्मण गानफाडे, सचिन मोहितकर,चंद्रकांत ढेंगळे यांनी अथक परिश्रम घेतले. #Establishment