सरकारची पाठराखण करण्यासाठी चमचेगिरी करू नका; आ. सुधीर मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांवर भडकले. #Maharashtra #sudhirmungantiwar

Bhairav Diwase


मुंबई:- मी बोलत असताना मला बोलू द्या, मधात-मधात का बोलतायं, सरकारची चमचेगिरी करण्यासाठी मधात-मधात तोंड घालू नका, असे म्हणत भाजपचे आमदार सुधिर मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांवर चांगलेच खवळले. पावशाळी अधिवेशनात ते बोलत होते. अनिल देशमुख असेच मधत बोलत होते. त्यांची हाकालपट्टी झाली, तुम्ही देखिल त्याच मार्गावर जातायं, तुम्ही तरी असे करू नका, समोरचा व्यक्ती बोलतांना त्याला बोलू नका, सरकारची पाठराखण करण्यासाठी चमचेगिरी करू नका, असेही मुंनगंटीवार म्हणाले. #Maharashtra #sudhirmungantiwar
या राज्याच्या जनतेला न्याय देता आला नाही. जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात येते. परंतू सरकारची पाठराखण करण्यासाठी काही जण चमचेगिरी करत आहेत. निदान ते तरी करू नका, असेही ते म्हणाले.
राज्यात आज ५ आणि उद्या ६ जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळणार आहे. दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच इतर मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. तर याच अधिवेशनात सत्ताधारी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण तसेच केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.