🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

डुकरांच्या हल्ल्यात युवक जखमी. #pigsattack

जैतापूर येथील घटना; वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे मोठे नुकसान.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा : शेतातून काम करून घराकडे येत असताना जैतापूर येथील विवेक गुलाब निब्रड (वय २१) यांच्यावर सकाळी ११ वाजता रस्त्याने येत असताना अचानक जंगली डुकराने हल्ला केला असून यात ते गंभीर जखमी झाले आहे. यावेळी शेतशिवारातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे उपचाराकरिता दाखल केले आहे.
विवेक नेहमीप्रमाणे सकाळ पाळीत शेतकामाकरिता शेतात गेला होता, शेतीचे काम करून घरी येत असताना झुडपात रस्त्याच्या कडेला झुडपात असलेल्या जंगली डुकराने विवेक निब्रड यांच्यावर हल्ला केला यात त्यांच्या दोन्ही पायाला व कंबरेला जबर मार लागला आहे. ऐन शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतात प्रत्येकाला जावे लागतात मात्र वन्यप्राण्यांच्या होत असलेल्या हल्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जैतापूर, मारडा, कुर्ली, पेल्लोरा, नांदगाव परिसरात झुडपी जंगल असल्याने हरीण, चित्तर, डुक्कर, रोही, ससा यासह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेती आहे, अनेकदा वन्यप्राणी शेतात येऊन शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वन्यप्राण्यांकडून होत असलेली शेतपिकांची नासाडी हि शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. पिकाच्या लागवडी पासून तर पीक हातात येईपर्यंत शेतपिकांचे रक्षण करावे लागत आहे, रात्री-बेरात्री पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना जागरण करावे लागते, वन्यप्राण्यांकडून हजारो रुपये किंमतीच्या मालाची नुकसान होत असताना वनविभाग तुटपुंजी मदत करून वेळ काढून नेत असते. वनविभागाकडून यावर कोणतीही उपाय योजना केली जात नसून याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे, वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ आर्थिक मदत करन्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. #pigsattack