ग्रामपंचायत चकफुटाणा येथे पशूधन लसीकरण. #pombhurna(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभूर्णा:- तालुक्यातील चकफुटाना या गावामध्ये ५ जुलै रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील पन्नासाहून अधिक जनावरांचा चावा घेतला व इतर पाळीव कुत्र्यांचा सुद्धा चावा घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. #pombhurna

लसीकरण करून येणाऱ्या संभाव्य धोक्यावर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत चकफुटाना मार्फत नवेगाव मोरे येथील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घिवे तसेच पोंभूर्णा येथील शिपाई साईनाथ ढपकस यांना बोलावून गावात लसीकरण करण्यात आले. लसीकरण करता वेळेस सरपंच सौ जयश्री दोलत अर्जूंकर, उपसरपंच ईश्वर पिंपळकर, सदस्य गणेश अर्जूनकर, लोकेश झाडे, तसेच ईश्वर अर्जुंकर, भावेश दुर्योधन, अंकुश चांदेकर, विजय अर्जुंकर, आदेश तेलसे व गावातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या