पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयातील पदभरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, राहुल संतोषवार जि. प. सदस्य यांची मागणी. #bjp #Demand #Recruitment #Hospital

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी पध्दतीने सफाई कामगार पदभरती करताना स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी देवाडा- केमारा जि. प. क्षेत्राचे सदस्य राहुल संतोषवार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केलेली आहे. तालुक्यातील सफाई कामगार पदभरतीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना ऑनलाइन बैठकीत सांगितले असल्याने स्थानिकांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे संतोषवार यांनी म्हटले आहे. #bjp #Demand 
तद्वतच सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवसात मोठ्या प्रमाणात किटक व डासांची उत्पत्ती वाढीस असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना पुरविल्या जाणाऱ्या फॉगिंग मशीन पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीची नावे निश्चित केलेली असल्याने लवकरात लवकर पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्याची विनंती सुध्दा केलेली आहे. यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्रांव्दारे जि. प. प्राथमिक शाळा सातारा कोमटी येथे वॉटर आर ओ मशीन, उमरी पोतदार व पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्लड प्रेशर मॉनिटर, आंबेधानोरा नविन इमारती मधील अंगणवाडी केंद्राला सोलर सिस्टीम, सातारा कोमटी प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूला व वस्तीत सोलर हॉयमॉस्ठ बसविणे तसेच ग्रामपंचायत सातारा भोसले अंतर्गत येत असलेल्या सातारा तुकुम येथील वीर बाबुराव चौकाचे सिमेंट कॉक्रीटीकरण करण्याची मागणी केलेली आहे. #Recruitment #Hospital

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत