महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोंभुर्णाचे धरणे आंदोलन. #pombhurna

Bhairav Diwase

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवले तहशीलदार मार्फत निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात महागाई ने भडका उडाला आहे जिवनावश्यक वस्तु व तेलाचे भाग गगणाला भिडले आहेत. या महागाईला आळा घालण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोंभुर्णा च्या वतीने प्रधानमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.सदर निवेदन तहशीलदार पोंभुर्णा यांच्या मार्फत पाठवण्यात आले. #pombhurna
पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल तालुका असुन तालुक्यातील जनता शेती व मजुरी वर अवलंबून आहे.यावरच ते आपली उपजीविका करतात.तालुक्यात लहान मोठे उद्योग नसल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही यातच संपूर्ण जगात कोरोणा महामारीने थैमान घातले होते याचा फटका पोंभुर्णा तालुक्याला बसला. लाकडाऊनने तालुकावासिय पुरता खंगुण गेला. परंतु आपल्या केंद्र सरकारने तेल व जिवनावश्यक वस्तु च्या किमतीवर भरमसाठ वाढ केल्याने प्रत्येक घराचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेल्या भाववाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोंभुर्णाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
देशात कोरोणा काळात लाकडाऊन मुळे स्थानिकांचे काम, रोजगार धंदे, कायमस्वरूपी बंद झाले. अश्या परीस्थितीत केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या दैनिक जीवनावश्यक वस्तू , गॅस, पेट्रोल, डिझेल,रसोयी तेल यांच्यात झालेल्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना विजय ढोंगे तालुका अध्यक्ष, भुजंग ढोले शहर अध्यक्ष, हिराजी पावडे कार्याध्यक्ष, संजय पावडे ओबीसी सेल अध्यक्ष, ऋषी हेपट जिल्हा सचिव,रुपेश निमसरकार, अल्काताई बुरांडे महिला तालुका अध्यक्ष, रोहिणी खोब्रागडे, सुमित्रा जुमणाके,, आदी मान्यवर उपस्थित होते.