🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करून महाविकास आघाडी सरकारने केली लोकशाहिची हत्या- माजी आमदार अँड संजय धोटे #Prohibition

भाजपा तालुका/शहर तर्फे मा.राज्यपाल यांना तहसीलदार राजुरा तर्फे दिले निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा।
राजुरा:- ओ.बी.सी.आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र शासनाने लोकशाहिचा मुडदा पाडला आहे.
महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन तद्दन दडपशाहिचे असून केवळ दोनच दिवसांचे अधिवेशन व त्यातही विरोधकांना बोलू न देणे हे हुकुमशाहिचे धोरण असून या निषेधार्थ राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वात तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले,

यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की अधिवेशनाच्या नावाने चाललेला हा गोंधळ तमाम महाराष्ट्राचा अपमान असून अश्या प्रकारे सरकार सुडाचे राजकारण करत असून या सरकारच्या या लोकशाही व ओ.बी.सी.विरोधी धोरणाचा आम्ही तिव्र निषेध करीत असून हे सरकार त्वरित बरखास्त करावे अशी मागणी यावेळी माजी आमदार अँड धोटे यांनी केली


यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजप तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य संजय उपगनलावार,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,भाजपा नेते महादेव तपासे,चुनाळा ग्रामपंचायत सरपंच बाळनाथ वडस्कर,माजी सरपंच हंसराज रागीट,ग्रामपंचायत सदस्य रवि गायकवाड, जनार्धन निकोडे,कैलास कार्लेकर,प्रशांत साळवे,आकाश रागीट परदेशी दंडीकवार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  #Prohibition