Top News

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर. #Result(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- युगंधर फाउंडेशन सोलापूर, जिनियस ग्रीन सोशल फाउंडेशन कोल्हापूर आणि युवा जनकल्याण चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय आॅनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युनोने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या वर्षी जास्तीत जास्त लोक सहभाग व युवकाना एकत्र पर्यावरण जनजागृती व संवर्धन संरक्षण उपक्रम घ्यावेत यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर लोकांनी सामाजिक अंतर पाळून सुरक्षित अंतर घरात राहुन देखील पर्यावरण विषयक आॅनलाईन स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला.या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक राहुल पाटील (जि.कोल्हापूर),द्वितिय क्रमांक सुवर्णा सलगर (जि.सोलापूर) तर तृतिय क्रमांक धनराज रघुनाथ दुर्योधन (जि.चंद्रपूर)यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे १५०० रुपये,१०००रुपये, ७००रुपये व प्रमाणपत्र देण्यात देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. जिनियस ग्रीन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मारुती पाटील व युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापिका रेश्मा माने यांनी सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 #Result

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने