Top News

दोन भावांच्या भांडणात एकाचा मृत्यू. #Death

घरगूती कारणांवरून मोठ्या भावाने केली लहान भावाची गळा दाबून हत्या.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दोन भावात भांडण झाल्याने मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची घटना आज राजुरा येथे घडली आहे.थोडक्यात माहिती नुसार राजुरा येथील सोमनाथपूर येथे सुरज देवगडे (21) या मोठ्या भावाने सख्खा लहान भाऊ मृतक धीरज देवगडे (19)याचा गळा दाबून मारल्याचा संशय असून राजुरा पोलिसांनी मर्ग दाखल करत सुरज देवगडे यास ताब्यात घेतले आहे.


घरी दोघां भावात भांडण झाले असता भांडणातील वादानंतर लहान भाऊ धीरज देवगडे हा अचानक चित्त पडल्याने त्याला राजुरा ग्रामीण रुग्णालयात नेले असता एक तासापूर्वी मृत्यू झाले असल्याचे सांगितले असले तरीही मृतकाच्या शरीरावर किंवा गळा दाबल्याच्या कोणत्याही खुणा वरकरनी आढळल्या नसल्याने व कुटुंबातील व्यक्तींचे बयान व घटनेचा ताळमेळ जुडत नसल्याने मृतकाच्या शववीच्छेदन अहवालनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. #Death

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने