Top News

गुरूपौर्णिमेनिमित्य प्राध्यापकांना 'विवेक यात्रा' भेट. #Bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या भद्रावती शाखेतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्य येथील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना 'विवेक यात्रा' हे पुस्तक भेट देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. #Bhadrawati
येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, उपप्राचार्य प्रा.महादेव बरडे, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बंडू दरेकर, प्रा. सचिन सरपटवार,नामदेव कोल्हे, प्रा. रोशन पारखी, मधुकर सावनकर व विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका राखुंडे आणि निळकंठराव शिंदे कला व विद्यान महाविद्यालयचे प्रा. संदिप प्रधान यांना गुरूपौर्णिमेनिमित्य स्वामी विवेकानंद यांच्या जिवन यात्रे वर आधारित 'विवेक यात्रा' हे पुस्तक देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नगरमंत्री बाळा उर्फ जयेश प्रशांत भडगरे, रोहित शेट्टी, यश चौधरी, तनुजा येरणे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने