Top News

भद्रावती येथे प्रथमच नॉलेज इज पॉवर अँड ब्युटी हंगामा -2021. #Bhadrawati



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील स्वागत सेलिब्रेशन या कार्यालयामध्ये नुकतेच इंडियन ब्युटीशीयन वेलफेयर असोशियन तर्फे त्वचेचा सेमिनार,नववधू स्पर्धा,सुंदरी स्पर्धाचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला भद्रावती येथील इनरवील क्लब चे प्रेसिडंट सौं खंडाळकर म्याडम,डॉ. माला प्रेमचंद म्याडम, साईप्रकाश अकॅडमीचे सभासद तथा साहित्यिक श्री क्षितिज शिवरकर सर,नागपूर येथील त्वचा स्पेशालिस्ट बुशरा मालवीया म्याडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व माता सरस्वती पूजनाने झाली. कार्यकमाचे प्रास्ताविक सौं. उज्वला यामावर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवरकर सर यांनी कार्यक्रमाच्या आयोजिक नयना गंधम यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. त्वचेच्या सेमिनार मध्ये त्वचा तज्ञ माननीय बुशरा म्याडम यांनी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्वचेची निगा कशी राखायची, त्वचेची व केसांची काळजी कशी घ्यायची, कोणत्या क्रीम वापरायच्या तशेच प्रश्न उत्तरातून उपस्थितांचे मार्गदर्शन केले त्वचा सेमिनार पार पडले.त्यानंतर वधू स्पर्धा,सुंदरी स्पर्धा (modaling compatetion miss fairy of the 2021) जिल्हा स्तरावर राबवण्यात आली.या दोन्हीही स्पर्धेत एकूण 120 स्पर्धकांनी सहभाग दर्शवीला. नववधू स्पर्धेचे परीक्षण मा. श्री जैन म्याडम (प्रोपेशनल मेकअप आर्टिस्ट)नागपूर, तर सौं. सरिता डांगे .(प्रोपेशनल मेकअप आर्टिस्ट)चंद्रपूर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम विजेती, सपना पंडित, चंद्रपूर, द्वितीय विजेती मयुरी दुर्गे, भद्रावती, तर तृतीय विजेती म्हणून वैशाली चौहान, चंद्रपूर ह्या ठरल्या. ह्या तिनही स्पर्धकांना सम्मानचिन्ह व सम्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व इतर सहभागी स्पर्धकांना मेडल व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. #Bhadrawati
त्यानंतर लगेच सुंदरी स्पर्धा (modaling compatetion miss fairy of the 2021)hi स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण सौं. मनीषा उईके (सुपर मॉडेल कर्लस मराठी 2021)गडचिरोली, सौं. नेहा चवरे नागपूर, सौं. सरिता झाडें, पुणे यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम विजेती कु. प्रतीक्षा भांदककर, भद्रावती, द्वितीय विजेती कु.प्रतीक्षा मेडपवार समुद्रपूर, व तृतीय विजेती स्नेहा अवताडे भद्रावती ह्या ठरल्या.या तिनही स्पर्धकांना मुकुट व सम्मानपत्र देण्यात आले. व इतर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले.
तळागळातील महिलांच्या गुणांचा व कौशल्याचा विकास व्हावा त्यांचा आत्मविश्वास वाढावा या करिता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रोपेशनल मेकअप आर्टिस्ट नयना गंधम,भद्रावती, IBWA न्याशनल रिप्रेझेटेटिव्ह मेकअप आर्टिस्ट सौं. उज्वला म्याडम, IBWA न्याशनल रिप्रेझेटेटिव्ह मेकअप आर्टिस्ट चे हेड राजेंद्र पांडा सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन व आभार सौं.नयना गंधम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौं.सुनीता खंडाळकर म्याडम, डॉ. माला प्रेमचंद, सुनीता थेरे, राजुरा, सरिता बेलोरकर नागपूर, नीलिमा मसे वणी, नमिता पाटील वणी, संगीता कांबळे भद्रावती, माधुरी घोडेस्वार नागपूर, सेजल बिश्वास भद्रावती, प्रीती परचाके, टीना सहस्त्रबुद्धे भद्रावती, प्रीती शिवरकर, स्यामुवेल गंधम, आनंद क्षिरसागर, किशोरभाऊ खंडाळकर, फोटोग्राफर अभिषेक आदिनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने