भारतीय सिमेंट मजदूर संघाची दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनासोबत बैठक संपन्न. #Korpana


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- भारतीय सिमेंट मजदुर संघाची नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी प्रशासनासोबत बैठक लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार गडचांदुर येथे संपन्न झाली असून यावेळी कंपनीचे युनिट हेड सुनील भुसारी,मानव संसाधन प्रमुख उमेश कोल्हटकर,व्यवसायिक प्रमुख गिरीश सोमानी, पराग पामपट्टीवार भारतीय सिमेंट मजदुर संघाचे नेते अँड.शैलेश मुंजे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, अनिल बंडीवार, किशोर राहुल, रामरूप कश्यप, सुनील टोंगे, प्रवीण शेंडे, राजू गोहणे उपस्थित होते. #Korpana
सदर बैठकीमध्ये कंपनीमध्ये स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, जुन्या ३०६ कामगारांना पैकी ८५ कामगारांना O&M मध्ये नौकरी दिली गेली असून ४१ जुन्या स्थायी कामगारांचे नियुक्ती पत्र तयार आहेत व बाकी कामगारांसुद्धा टप्या टप्याने कामावर घेऊ व तसेच उरलेल्या बाकी जुन्या कंत्राटी कामगारांना कंपनीमध्ये प्राधान्याने कामावर घेऊ अशी माहिती कंपनी प्रशासनाने यावेळी दिली.
   
तसेच भारतीय सिमेंट मजदुर संघाचे स्वतःचे स्वतंत्र कामगार संघटन ३६१६ या क्रमांकाची नोंदणी असून काही कामगार संघटना आम्ही भारतीय सिमेंट मजदुर संघाची संलग्न आहो असे सांगत कंपनी प्रशासन व कामगारांची दिशाभूल करत होते,त्यामुळे भारतीय मजदुर संघाचे प्रदेश अध्यक्ष यांनी पत्राद्वारे मे महिन्यात तसा सविस्तर खुलासा केला आहे त्यामुळे कोणत्याही कामगार संघटनेवर भारतीय मजदूर संघाशी संलग्नता आहे म्हणून विश्वास ठेवू नका अशी माहिती यावेळी अँड.शैलेश मुंजे यांनी यावेळी कंपनी प्रशासनाला दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत