🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अँड. मारोती कुरवटकर यांनी जन्मदिनाचे औचित्य साधून केले रक्तदान शिबिराचे आयोजन. #Blooddonation

५० रक्तदात्यांनी केले अमूल्य रक्तदान.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- अँड. मारोती कुरवटकर यांच्या ३८ व्या जन्मदिननिमित्त आज दि.२५/०७/२०२१ ला श्रीराम मंदिर राजुरा,येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.सदर शिबिरात ५० रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान करून "रक्तदान हेच श्रेष्ठदान" या उक्ती प्रमाणे सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन टेम्बुरवाही येथील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा वर्कर किरणताई कैलासगेवार यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड सर होते.प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपीपरीचे माजी नगराध्यक्ष संजय झाडे,समाजसेवा अधीक्षक संजय गावित, मंगीचे उपसरपंच वासुदेव चापले, लहुजी चहारे माजी सरपंच,दशरथ चापले,गणपतराव कुरवटकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.


 रक्तदान शिबिराचे आयोजन ज्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने करण्यात आले होते असे ते ऍड.मारोती कुरवटकर मंचकावरून बोलताना म्हणाले की,प्रत्येक व्यक्ती आपला जन्मदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करताना आपण समाजात बघतो,परंतु आज घडीला संपूर्ण विश्व कोविड-१९ या महाभयंकर महामारीने ग्रासलेले असून अश्या काळात आरोग्य सेवेची समाजाला नितांत गरज आहे.अश्या कोरोनाच्या संकटसमयी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून,रक्तदानाचे कार्य मोठ्या प्रमाणात होणे अत्यंत आवश्यक आहे.त्याच सामाजिक बंधीलकीतून आपण आज या रक्तदान शिबिराचे आयोजन केले.समोर बोलताना ते म्हणाले की भविष्यात,आपण देहदान करण्याचा संकल्प केला आहे.आणि इतरांनी सुद्धा समोर येऊन सामाजिक उप्रकम राबवून असे भविष्यात आयोजन करावे.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक उमेश पारखी यांनी केले,सूत्रसंचालन सुधीर झाडे,आणि आभार रामरतन चापले यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेकरिता ज्यांनी मोलाचे सहकार्य केले ते रामरतन चापले,रवींद्र कुरवटकर,प्रेमसागर राऊत, भाऊराव भोंगळे, संदीप घोटेकर,रोशन येवले, सुधाकर धोटे,गुरू गेडाम,खुशाल लोणारे,शुभम खेडेकर,सर्वेश मांडवकर,अमोल राऊत उपस्थित होते. #Blooddonation