जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

खासदार अशोक नेते यांची वाघाने, बिबट्याने हल्ला केलेल्या गावांना भेट. #Saoli


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- व्याहाड बुज,सामदा, व वाघोली बुट्टी, या परिसरातील बिबट्याने मानवावर केलेल्या जीवित हल्ल्याच्या घटनेची माहिती मान.खास. अशोकजी नेते यांना तालुकाध्यक्ष,अविनाश पाल यांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मान. खास. अशोकजी नेते यांनी व्याहाड बुज येथील बिबट्याने हमला करून ठार केलेल्या गंगुबाई रामदास गेडाम यांच्या घरी जाऊन भेट देऊन त्या परिसराची पाहणी केली.व त्यांच्या पतीला धीर देऊन सांत्वन केलं. तसेच शासनाकडून संपूर्ण मदत मिळवून देण्यासाठी वनअधिकारी यांना सूचित केले. #Saoli

त्यानंतर वाघोली बुट्टी येथील बिबट्याने गंभीर जखमी केलेली महिला तुळसाबाई बाबुराव म्हशाखेत्री यांची सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जाऊन तब्येतीची विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमी झालेल्या रुग्णाची काळजी घेण्यास सांगितले. व त्यांच्या वाघोली बुट्टी येथील गावातील वस्तीतील असलेल्या घटनास्थळी घरी जाऊन भेट घेऊन त्या कुटुंबातील प्रमुखांना धीर देऊन शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळवून देऊ असे आश्वासीत केले. तसेच वाघोली बुट्टी येथील नवनिर्वाचित सरपंच यमुताई होमनाथ मेश्राम हिचे सुद्धा कौतुक केले. त्यानंतर सामदा येथील विठ्ठल गेडाम या व्यक्तीला वन्यप्राण्याने हमला करून जखमी केलेल्या इसमास प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले व शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी वनअधिकारी यांना सूचना केली.

      व्याहाड बूज.सामदा, वाघोली बुट्टी या परिसरात  बिबट्याने केलेल्या हल्ल्यात इत्यादी गावांना भेट देऊन खास.अशोकजी नेते यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली. त्यानंतर खासदार अशोकजी नेते यांनी दिनांक 24 /7 /2021 ला दुपारी 2.40 वाजताच्या दरम्यान व्याहाड खुर्द येथील वनक्षेत्र अधिकारी मान.बुरांडे साहेब यांनी बिबट्याला पाहिलेल्याची खात्री झाली आणि संपूर्ण गावातील जनता एकत्र जमली. आणि सर्व गावकरी जनतेचा एकच आक्रोश होता की बिबट्याला जेरबंद करा नाहीतर शॉटशुटर ने मारा याची कल्पना खासदार अशोकजी नेते यांना झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणची पाहणी केली असता गावाच्या सभोवताल कुठलेही जंगल नाही पण डोंगराच्या परिसरात हा बिबट राहत असावा व रात्रीच्या वेळेस हमला करीत असावा म्हणून खासदार अशोक जी नेते यांनी व्याहाड बुज येथील ग्रामपंचायत ला भेट देऊन गावातील समस्या जाणून घेऊन  गावामध्ये शिरकाव होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या समस्येबद्दल सीसीएफ  यांना दूरध्वनीवरून सूचना देऊन वनपरिक्षेत्राधिकारी मान.कांबळी साहेब व क्षेत्रअधिकारी बुराडे साहेब व इतर वन कर्मचाऱ्यांना सूचना  करून लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करा किंवा शॉटशूटर चा वापर करून बिबट्याला बेशुद्ध करा अशी सूचना वनविभागाला दिली.                     
       
          त्यावेळी उपस्थित खा.अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर.अविनाश पाल, माजी.बांध.सभापती संतोष साव. तंगडपलीवार, उपसभापती रवींद्र बोलीवार, प्र.सरपंच परशुराम भोयर, सामदा येथील सरपंच शुभांगी मडावी, उपसरपंच नितीन जुवारे,ग्रा.सदस्य मनोज खेवले, वैशाली साखरे,उषा पोहनकर, शरद मडावी, प्रवीण देशमुख, तुळशीदास भुरसे, विठ्ठल गेडाम, वाघोली बुट्टी सरपंच यमुताई मेश्राम,उपसरपंच नितीन कारडे,ग्राम.पं सदस्य दिवाकर गेडाम,डॉ.तोडेवार, ग्राम.पं सदस्य धनराज गुरनुले, विद्या बोरकुटे,मालता गेडेकर, होमनाथ मेश्राम, तुळशीदास पा. रोहनकर, पुरुषोत्तम बोरकुटे,मानिक रोहनकर, संजय गेडेकर, अशोक ठाकरे, बंडूजी नीकेसर, मनोज गेडाम, रामभाऊ गेडाम, इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत