(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील महाले यांनी भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते क्रिष्णा तुराणकर यांची राकाॅंचे शहर उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती केली.
ही नियुक्ती येथील हाॅटेल साई दर्शनमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजू वैद्य यांच्याशी चर्चा करुन व त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन केली. यावेळी जिल्ह्याचे युवा नेते तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष जगदिश जुनघरी, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, राकेश किनेकर,बिपिन देवगडे, अजय वावरे, परवेज शेख उपस्थित होते. नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर पदधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. #Selection