Top News

चंद्रपुरात शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न. #shivsena #shivsenachandrapur


महिला आघाडी ची ताकद वाढवण्यास सुरुवात.

मित्रनगर येथे महिला शाखेचा जल्लोषात अनावरण.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपुर:- शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे  यांच्या नेतृत्वात सौ.मनस्वीताई गिऱ्हे यांच्या अथक प्रयत्नाने चंद्रपुर शहरातील मित्रनगर येथे पाऊस सुरु असतांना पक्ष निष्ठा जपत महिला शाखा उद्घाटन कार्यक्रम उत्सवात पार पडला. आगामी निवडणुकीमध्ये भगवा फडकवण्यासाठी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांच्या स्वप्न पुर्ण करण्याचा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार शिवसेना महिला आघाडीने केला आहे. #shivsena #shivsenachandrapur

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ मॉसाहेब, सावित्रीबाई फुले व हिंदू हृदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमाचे पूजन शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम व मान्यवरांनी केले.तद्नंतर काही महिला पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आले.
यावेळी उपशहर प्रमुख सौ.लताताई घोरपडे, विभाग प्रमुख सौ.आरती टेपल्लवार, उपविभाग प्रमुख सौ.प्रिय्ंका येवले,तर शाखा प्रमुख सौ.मेघा निकोडे, उपशाखा प्रमुख सौ.प्रिय्ंका जगताप यांची निवड करण्यात आली. महिलांनी समाजकारणात, राजकारणात दोन पाऊल पुढे यावे शिवसेना बळकट करण्यासाठी आपल्याला महिला आघाडीच्या माध्यमातून जोमाने कार्य करावे शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असे आपल्या मनोगतात जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख सिक्कीभाय्या यादव,राहुलभाऊ विरुटकर,आशिष कावटवार, माजी महिला जिल्हा प्रमुख सौ. कुसुमताई उदार, अनिता प्रजापती, सौ. प्रियंका बर्जे, सौ. रोशनी मोगरे, सौ.इब्राहिम शेख,सौ.अनिता दुपारे,सौ. शारदा सलोडकर,सौ. वंदना वानखडे,सौ.ममता मोहुले, सौ.अनुलोम उरले,सौ. विना गोणे, सौ. सविता मोहुरले, सौ.सोनाली कुकडकर,सौ मनीषा मडावी सौ. हेमलता चीखघरे,सौ. लक्ष्मी राऊत,सौ. दिपाली सहारे सौ.सोनू आंबेडकर,सौ. संगीता चावरे सौ. संगीता वागदे, सौ.आरती गिरडकर सौ छाया गिरडकर सौ. अनिता नरोटे,सौ.जिजाबाई आंबेडकर सौ सारिका ढोके सौ. सुशीला राऊत सौ.अनिता नरोटे सौ.रंजीता पाटील ममता नवघरे सौ. पार्वताबाई दुर्वे सौ चंद्रकला घोडे सौ. माया गायकवाड सौ. विद्या जोगी मडावी सौ.तृप्ती मोहितकर सौ. वच्छला मडावी व आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने