Top News

शेवटच्या घटकाच्या समाधानासाठी झटणाराचं सच्चा लोकप्रतिनिधी असतो. - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे. #bjpchandrapur #Bjp


चंद्रपूर पं. स. उपसभापती पदी विकास जुमनाके विराजमान.

जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत पार पडले पदग्रहण.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती विकास जुमनाके यांचा पदग्रहण सोहळा आज जि. प. माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसभापती दालनात पार पडला. #bjpchandrapur #Bjp


चंद्रपूर पंचायत समितीच्‍या उपसभापतीची जागा घुग्‍गुस नगरपालिका झाल्‍यामुळे गोठविल्‍या गेल्याने निरीक्षण तांड्रा यांच्‍या जागेवर चंद्रपूर पंचायत समिती उपसभापतीपदी म्हणून भाजपचे विकास जुमनाके हे विराजमान झाले आहेत.


     याप्रसंगी, उपसभापती विकास जुमनाके यांना पदारूढ करुन त्यांना पुढिल यशस्वी वाटचालीसाठी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. 

याठिकाणी बोलतांना, गेल्या बाविस वर्षापासून चंद्रपूर पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. आणि त्यामाध्यमातून भाजपच्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी तसेच पदाधिकाऱ्यांनी या भागातील उपेक्षित, वंचित घटकांच्या विकासासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. जनसेवेचे हे सत्कार्य यापुढेही आपल्या माध्यमातुन असेच निरंतर चालू राहील. अशी अपेक्षा करतो. यासोबतच एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून लोकांच्या जशा अपेक्षा आहेत तशाच अपेक्षा पक्षालाही आहेत. त्यामुळे चंद्रपूराच्या ग्रामीण भागात पक्ष विस्तारासाठी आपल्या माध्यमातुन प्रयत्न व्हावे. प्रत्येक बूथवर भाजपचे संघटनात्मक बळकटीकरण कसे होईल, याकडे  आपण लक्ष दिले पाहिजे. सेवा, संपर्क आणि संघर्ष या त्रिसूत्रीचे पालन करून भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याने आता पक्षबांधणीला लागावे. असे प्रतिपादन त्यांनी केले. 

पुढे बोलताना, खरेतर लोकप्रतिनिधींना समाजाचे मोठे देणे लागते, त्यामुळे शेवटच्या घटकाच्या समाधानासाठी झटून जुमनाकेजींनी एक सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून पुढे यावं. असेही ते आवर्जून म्हणाले. 
यावेळी, पं. स. सभापती सौ. केमा रायपुरे, जि. प. सदस्य रंजित सोयाम, पं. स. सदस्य चंद्रकांत ढोढरे, सौ. वंदना पिंपळशेंडे, सौ. सविता कोवे, सौ. दुर्गा बावणे, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, जेष्ठ नेत्या सौ. शोभा पिदूरकर, निरिक्षण तांड्रा, अनिल डोंगरे, सुभाष पिंपळशेंडे, पंकज ढेंगरे, प्रकाश तावाडे, विजय आगरे, ऋषी कोवे, ईश्वर जुनारकर, महेश कोलावार, मुन्ना पिदूरकर, नामदेव हरडे आदिंसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने