(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभिड:- तळोधी बा. लोकमत वृत्तपत्र समुह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर, तळोधी बा. येथील अनेक सामाजिक संघटना तसेच वंचित बहुजन आघाडी नागभिड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत चे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आज सोमवार दि. 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत साई मंदिर तळोधी बा. येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये वंचित बहुजन आघाडी नागभिड काही कार्यकत्यांतर्फे रक्तदान करण्यात आले. त्यात प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे, तालुका जेष्ट कार्यकर्ते चंद्रभानजी रामटेके कन्हाळगाव, युवा कार्यकर्ते रक्षित रामटेके तसेच गिरगाव येथून गिरगाव चे प्रथम नागरिक सरपंच साहेब प्रशांत गायकवाड आणि विकेश सुहास सोनवाने आणि इतर समूहातील सदस्यांनी रक्तदानाची भूमिका बजावले.
तसेच रक्तदान कर्त्याना महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण आणि लोकमत वृत्तपत्र समुहा तर्फे प्रमाणपत्र आणि एक लॅपटॉप बॅग प्रोत्साहन पर देण्यात आले.
#Blood #donation