राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक अशोक जीवतोडे यांचा राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश. #NCP

Bhairav Diwase

चंद्रपुर:- राष्ट्रीय ओबासी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक ओबीसी नेते प्राचार्य डॉ अशोक जिवतोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. #NCP
अशोक जीवतोडे हे विदर्भातील शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात त्यांनी विदर्भात ओबीसी चळवळीला मोठे रूप दिले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवारांची भेट घेत जीवतोडे यांनी प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती.