गोंडपिपरी तालुक्यात खतामध्ये आढळले काळे दगड. #Stone #gondpipari


शेतकऱ्यांची खत कंपन्यांकडून फसवणूक.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपीपरी:- तालुक्यातील मौजा सुपगाव येथील शेतकरी मनोज दुर्गे यांनी पिकाच्या वाढीकरिता गोंडपीपरी तालुक्यातील एका कृषी केंद्रातुन खताची खरेदी केली. #Stone #gondpipari

दि.10 जुलै रोज शनिवारला कपाशीच्या पीकाला खत देण्यासाठी खताची बॅग शेतात घेऊन गेले असता अमोनिया सल्फेट ची 20 :20: 0: 13 या बॅग मध्ये काळे दगड आढळून आल्याने खत कंपनीकडून खतात काळे दगड मिसळवून फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आधीच गोंडपीपरी तालुक्यात असणाऱ्या कृषी केंद्रात बेभाव दराने बियांनाची, खताची विक्री केली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. अश्यातच गोंडपीपरी तालुक्यातील मौजा सुपगाव येथील शेतकरी मनोज दुर्गे यांनी काही दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या कृषी केंद्रातुन 20:20:0:30 खत खरेदी केले. त्यात काळे दगड आढळून आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची शेतकऱ्यात चर्चा सुरू झाली आहे.
अमोनियम फास्फेट सल्फेट 20:20:0:13 असे ह्या खताचे नाव असून बरेच शेतकरी शेतपिक जोरदार येण्यासाठी ह्या खताची खरेदी करतात. अश्यातच खतात काळे दगड टाकून फसवणूक केली जात असल्याने तालुका कृषी विभागाने याकडे लक्ष देवुन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणूकिवर आळा बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत