Click Here...👇👇👇

श्री शिवाजी महाविद्यालयात ई- पोस्टर मेकिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन. #Computation

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- येथील रसायनशास्त्र विभाग ,श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा व मध्य चंदा वनविभाग चंद्रपूर, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने "वन्यजीव संरक्षण: नामशेष होण्यापूर्वी जतन करा" या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील ई - पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेकरिता देशभरातून ९२ विद्यार्थ्यांनी आपले पोस्टर्स पाठवले होते. स्पर्धेचा निकाल 8 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात आला . ई-पोस्टर मेकिंग स्पर्धेचे परीक्षण श्री. एस. बोरकर (माजी प्राचार्य), श्री अतुल कामडी (प्राचार्य) आणि डॉ. विजय रुद्रकार (व्याख्याता), ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय, नवरगाव, जि. चंद्रपूर यांनी केले.
प्रथम पारितोषिक रू ५०००/- रोख राहुल हुल्के, एस. पी. कॉलेज, चंद्रपूर (महाराष्ट्र ) ह्याला मिळाला. द्वितीय पारितोषिक रू ४०००/- दीपा कुमारी चौरसिया, झेड.ए. इस्लामिया पीजी कॉलेज सिवान, जय प्रकाश विद्यापीठ छपरा, बिहार हिला मिळाला, तृतीय पारितोषिक रु ३०००/- रोख कसक नौटियाल, श्री देव सुमन पदवी महाविद्यालय चिन्याली सौर, उत्तराखंड हिने पटकावला, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. १०००/- रोख हिमांशी पाठक, जी.पी.जी.सी. बेरीनाग पिथौरागड, एस.एस.जे. विद्यापीठ अल्मोडा, उत्तराखंड आणि एस. पी. कॉलेज, चंद्रपूर (महाराष्ट्र) ची वैष्णवी हळकरे यांना देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, उपप्राचार्य डॉ. आर. खेरानी, श्री. ए. डी. मुंढे, वन उपसंरक्षक (मध्य चंदा वन विभाग, चंद्रपूर) यांनी स्पर्धेत मोलाचे योगदान दिले. प्रा. व्ही. के. शंभरकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख, प्रा. सुवर्णा नलगे, सहाय्यक प्राध्यापक,  श्री. सागर ओदेलवार, सहाय्यक प्राध्यापक तसेच श्री. रवी लिपटे यांनी अथक परिश्रम घेतले.
#Computation