विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांना टोला; "घोषणा बैलांना आवडल्या नसणार". #nagpur #Announcement #Tola

नागपूर:- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. त्यांनी काँग्रेसच्या बैलगाडी आंदोलनाचा उडालेल्या फज्जावरुन राहुल गांधी यांना चिमटा काढला. याचबरोबर त्यांनी 'लोकांमध्ये राज्यसरकारबद्दल एवढी नाराजी आहे की, राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी सरकार धाराशाही होईल.' असा दावाही केला. ते आज नागपुरात बोलत होते. #nagpur #Announcement #Tola

🍾दारुबंदी उठल्यामुळे चंद्रपूरात बार मालकांकडून ना. विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा.

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की 'राज्य सरकार मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचारही करणार नाहीत. कारण की त्यांना माहीत आहे की लोकांमधे महाविकास आघाडी सरकार बद्दल प्रचंड नाराजी आहे.

त्यामुळे मध्यावधी निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, हे माहीत असल्यानेच ते निवडणुका घेणार नाही.'
राहुल गांधीच्या नावाच्या घोषणा बैलांना आवडल्या नसणार

याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काँग्रेस नेत्यांनी इंधनवाढी विरोधात केलेल्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली. बैलगाडीतून सुरु केलेल्या या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्ते 'देश का नेता कैसा हो राहुलजी जैसा हो', असे नारे लावत होते. याच दरम्यान बैलगाडीवर भाई जगताप यांच्याबरोबरच मोठ्या संख्येने कार्यकर्तेही चढले. बैलांना हा भार पेलावला नाही आणि गाडीवरील कार्यकर्ते उभे असलेला मंच खाली पडला.
या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी 'देश का नेता कैसा हो राहुलजी जैसा हो' ही नारेबाजी कदाचित बैलांनाही आवडली नसेल म्हणून कॉग्रेसचे सर्व नेते बैलगाडी वरून खाली पडले.' असा चिमटा काढला. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे सर्व नेते बैलगाडी वर चढले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत